एशियाटिक सोसायटी सरकारने ताब्यात घ्यावी

एशियाटिक सोसायटी 
सरकारने ताब्यात घ्यावी
Published on

एशियाटिक सोसायटी
सरकारने ताब्यात घ्यावी

पुन्हा कर्मचारी संघटनेची मागणी

मुंबई, ता. २७ : एशियाटिक संस्थेने आपल्या २२० वर्षांच्या कारकीर्दीत ज्ञानदानाचे, संशोधनाला चालना देण्याचे कार्य, शासनाच्या तसेच देणगीदारांच्या सहकार्यातून केले. आता ही संस्था व्यवस्थापनाच्या चुकीच्या कामकाजामुळे प्रचंड मोठ्या संकटात सापडली आहे. तिला वाचविण्यासाठी सरकारने ती तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी एशियाटिक सोसायटी मुंबई एम्प्लॉईज युनियनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
युनियनचे अध्यक्ष कॉ. प्रकाश रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात एशियाटिक सोसायटी व्यवस्थापन तथाकथित आणि संकुचित स्वायत्तता जपण्याच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे. आपले स्वसाक्षरीचे २७ फेब्रुवारी २०२४ चे एशियाटिकला लिहिलेले पत्र आताच्या अध्यक्षा व्हिस्पी बालापोरिया यांनी पदाधिकाऱ्यांपासून दडवून ठेवले आणि तब्बल वर्षभरात २१ फेब्रुवारी २०२५ ला इतर व्यवस्थापन समिती सदस्यांसमोर ठेवले आहे. हे पदाधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचे गंभीर उदाहरण असल्याचे कॉ. रेड्डी यांनी म्हटले आहे.
व्यवस्थापनाकडून वेळोवेळी शासनाकडून आलेले अनेक प्रस्ताव आणि विकासासंदर्भातील कागदपत्रे दडवून ठेवली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे गैरकारभाराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे; परंतु पदाधिकारी व विश्वस्त त्याकडे कानाडोळा करीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. संस्थेचे आर्थिक व सांस्कृतिक नुकसान होत असल्याने सरकारने आता कोणताही विलंब न लावता ही संस्था आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
--
कोट
आम्हाला केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळते ते विविध उपक्रमांसाठी असते. त्यात वेतनाचा समावेश नसतो, मात्र कर्मचाऱ्यांनी संस्थेबद्दल एक नकारात्मक मानसिकता बनवली आहे. यामुळे अनेकदा ते सहकार्य करत नाहीत. अनेक संस्था उपक्रम, प्रकल्पांसाठी निधी द्यायला तयार होतात; परंतु वेतनासाठी मिळत नाही. आम्ही अनेक तडजोडी करून त्यांचे वेतन काढण्याचा प्रयत्न करतो. तरीही ते संस्थेच्या विरोधात भूमिका घेतात, हे योग्य नाही.
- व्हिस्पी बालापोरिया, अध्यक्षा, एशियाटिक सोसायटी, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com