

सीए फायनल परीक्षा
आता वर्षातून तीन वेळा
आयसीएआयची घोषणा
मुंबई, ता. २७ : देशभरात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत घेतली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) फायनल परीक्षा २०२५पासून वर्षातून दोनऐवजी तीन वेळा घेतल्या जाणार आहेत, याची अधिकृत घोषणा गुरुवारी (ता. २७) आयसीएआयने केली.
गतवर्षी आयसीएआयने इंटरमिजिएट आणि फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या परीक्षा वर्षातून तीन वेळा घेण्याचा निर्णय घेतला होता आणि सीए फायनल परीक्षाही त्याच पद्धतीने घेतल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. जागतिक स्तरावरील विविध प्रकारच्या अकाउंटंट्स आणि इतर परीक्षा आणि त्यासाठी असलेल्या सर्वोत्तम पद्धतींशी जुळवून घेण्यासाठी आणि देशातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी देण्यासाठी आयसीएआयच्या २६व्या परिषदेने वर्षातून तीन वेळा सीए फायनल परीक्षा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. माहिती प्रणाली ऑडिटमधील पदव्युत्तर पात्रता अभ्यासक्रमातही बदल केला जाणार आहे. त्यासाठीची माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आयसीएआयने जाहीर केलेल्या निवेदनात सीए फायनल, इंटरमीडिएट आणि फाउंडेशन या तिन्ही स्तरांमध्ये दरवर्षी समान संख्येने प्रयत्न केले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची अधिक संधी मिळेल. या परीक्षा जानेवारी, मे आणि सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील. पूर्वी जून आणि डिसेंबरमध्ये वर्षातून दोनदा घेण्यात येणारी मूल्यांकन चाचणीही वर्षातून फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबरमध्ये घेतली जाईल, असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.