गुढीपाडव्‍यानिमित्त खरेदीचा उत्साह

गुढीपाडव्‍यानिमित्त खरेदीचा उत्साह
Published on

गुढीपाडव्‍यानिमित्त खरेदीचा उत्साह

बांबूची काठी, साखरमाळांनी बाजारपेठा सजल्या; दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केटमध्ये गर्दी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त नागरिकांनी शुक्रवारी (ता. २८) बाजारात मोठी गर्दी केली होती. बांबूची काठी, साखरेच्या माळा, फळे, चाफ्यांच्या फुलांची माळ, कलश, मिनी गुढीसह तोरण, फुले, रेडिमेड साडी अशा विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. कार्यालय सुटल्यानंतर अनेकांनी थेट खरेदीसाठी धाव घेतल्यामुळे लालबाग, दादर, क्रॉफर्ड मार्केटसह उपनगरातील बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या.
गुढीसाठी बांबूची काठी ८० ते २०० रुपयांना मिळत आहे, तर साखरेच्या माळेची किंमत २० ते ५० रुपये आहे. झेंडू, अस्टरची फुले ६० ते १०० रुपये किलोने मिळत आहेत. तयार फुलांची तोरण ३० ते ७० रुपयांपर्यंत आहेत. याचबरोबर लोकरीचे, मोत्यांच्या, कापडाच्या तोरणांना प्रचंड मागणी आहे. १५० ते ५०० रुपयांपर्यंत ही तोरणे उपलब्ध आहेत. कडुलिंबाची पाने, आंब्याचे डहाळेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चाफ्याच्या फुलांच्या माळा २० ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी रंगांच्या साखरगाठी २० रुपये ते १०० रुपयांपर्यंत आहेत. आंब्याचा हंगाम सुरू असल्याने पाडव्यासाठी आंबे खरेदी होताना दिसत आहे.
.......
रेडिमेड साडीला पसंती
नोकरदार महिलांना गुढी सजवण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे बाजारात गुढीसाठी रेडिमेड साडी बाजारात आणली आहे. पैठणी, भरजरी काठाची आणि सुंदर नक्षीकाम, रेशीम काठ, खण-काठाची अशा प्रकारांत या साड्या उपलब्ध आहेत.
----
विविध आकारांत रेडिमेड गुढ्या
गुढी : किंमत (रुपये)
नऊ इंच : ८० ते १२०
एक फूट : १५० ते १८०
दीड फूट : २०० ते २५०
------
पुरणपोळ्यांसह विविध पदार्थांचा बेत
सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच केसर, ड्रायफ्रूट, पुष्पखंड, स्ट्रॉबेरी, आम्रखंड अशा विविध प्रकारचे श्रीखंडांनाही मागणी असते. नोकरदार महिला रेडिमेड पुरणपोळीला अधिक पसंती देत आहेत. डाळ, खोबरे, मूगडाळ, तीळ, गाजर, खजूर, खव्याची पुरणपोळी, शुगर फ्री, अननस, गुलकंद, चॉकलेट, बदाम, फणस, ड्रायफ्रूट असे विविध पुरणपोळ्यांचे प्रकार उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com