रुग्णालयांच्या खासगीकरणाविरुद्ध थाळीनाद

रुग्णालयांच्या खासगीकरणाविरुद्ध थाळीनाद
Published on

रुग्णालयांच्या खासगीकरणाविरुद्ध थाळीनाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महापालिका उपनगरातील अनेक रुग्णालये खासगी हातात सोपवण्याच्या तयारीत आहे. याविरोधात म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने सायन रुग्णालयासह गोवंडीच्या शताब्दी आणि शिवडीच्या टीबी रुग्णालयातही थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) योजनेंतर्गत कांदिवलीतील भगवती, एम.टी. अग्रवाल मुलुंड, वांद्रेचे भाभा, गोवंडीचे शताब्दी, बोरिवलीचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय आणि विक्रोळीचे महात्मा फुले रुग्णालय खासगी संस्थांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.  आतापर्यंत या खासगीकरणाला सर्वच पक्षांनी विरोध केला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार केले जातात, असे युनियनचे म्हणणे आहे. खासगीकरणानंतर उपचारांचा खर्च वाढून त्याचा सर्वसामान्यांना फटका बसणार असल्याचा दावाही युनियन करीत आहे. भाभा, शताब्दी, मुलुंड-एमटी अग्रवाल आणि भगवती या रुग्णालयांच्या आधुनिकीकरणावर महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे.
--------------------
कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय नाही!
रुग्णालयांचे खासगीकरण कर्मचाऱ्यांच्या हिताचे नाही. अनेक वर्षांपासून रुग्णांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्यत्र पाठवले जात आहे किंवा त्यांची पदे काढून टाकली जात आहेत. नोकरदारांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com