मध्य रेल्वेच्या १३२ उन्हाळी स्पेशल ट्रेन

मध्य रेल्वेच्या १३२ उन्हाळी स्पेशल ट्रेन
Published on

मध्य रेल्वेच्या १३२ उन्हाळी स्पेशल
एकूण समर स्पेशल ट्रेनची संख्या ९८६ वर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : उन्हाळी हंगामात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने त्यांच्या सुविधांसाठी विशेष तयारी केली आहे. नियमित गाड्यांव्यतिरिक्त, २७८ अनारक्षित गाड्यांसह एकूण ९८६ उन्हाळी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी ८५४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली होती, मात्र प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार आणखी १३२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) खोरधा रोड साप्ताहिक ट्रेन (२६ फेऱ्या)
०१०४९ ट्रेन ५ एप्रिल ते २८ जून यादरम्यान दर शनिवारी सीएसएमटीहून रात्री ११.०५ वाजता सुटून खोरधा रोडला तिसऱ्या दिवाशी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीकरिता ०१०५० ट्रेन ७ एप्रिल ते ३० जून यादरम्यान दर सोमवारी दुपारी अडीच वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी येईल.
----
सीएसएमटी– नारंगी साप्ताहिक ट्रेन (८ फेऱ्या)
०१०६५ ट्रेन १० एप्रिल ते १ मे यादरम्यान दर गुरुवारी सीएसएमटीहून सकाळी ११.०५ वाजता सुटून नारंगीला तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. परतीकरिता ०१०६६ ट्रेन १३ एप्रिल ते ४ मे यादरम्यान दर रविवारी पहाटे ५.२५वाजता सुटून सीएसएमटीला तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी येईल.
------
सीएसएमटी-रीवा साप्ताहिक अतिजलद ट्रेन (२४ फेऱ्या)
०२१८८ ट्रेन ११ एप्रिल ते २७ जून यादरम्यान दर शुक्रवारी सीएसएमटी येथून दुपारी दीड वाजता सुटेल आणि रीवा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता पोहोचेल. परतीकरिता ०२१८७ ट्रेन १० एप्रिल ते २६ जून यादरम्यान दर गुरुवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी येईल.
---
कोल्हापूर-कटिहार ट्रेनच्या ८ फेऱ्या होणार असून, ०१४०५-०६ ट्रेन ६ ते २९ एप्रिल यादरम्यान दर रविवारी धावणार आहे.
लातूर-हडपसर ट्रेनच्या १४ फेऱ्या होणार असून, ०१४२९-३० ट्रेन ७ ते २८ एप्रियादरम्यान दर सोमवार, शुक्रवार धावणार आहे. हडपसर-राणी कमलापती साप्ताहिक ट्रेनच्या २४ फेऱ्या होणार असून, ०१६६८-६७ ट्रेन १० एप्रिल ते २७ जूयादरम्यान दर शुक्रवारी चालविण्यात येणार आहे.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com