ड्रोन तंत्रज्ञानासाठी सामंजस्य करार

ड्रोन तंत्रज्ञानासाठी सामंजस्य करार
Published on

ड्रोन तंत्रज्ञानासाठी सामंजस्य करार
संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण

मुंबई, ता. ४ : भारतातील प्रमुख संरक्षण अभियांत्रिकी कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लि.ने प्रगत ड्रोन तंत्रज्ञानासाठी इस्राईलच्या मायक्रोकॉन व्हिजन लि.सोबत सामंजस्य करार केला आहे.
हा करार भारतीय संरक्षण आणि ड्रोन उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे पारस डिफेन्स भारतात कमी किमतीत प्रगत ड्रोन कॅमेरा तंत्रज्ञानाचा विशेष पुरवठादार बनेल. पारस डिफेन्स उच्च प्रमाणात स्वदेशी तंत्रज्ञान वापरून आयएसआर पेलोड (इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स आणि रिकनायन्स) ड्रोन कॅमेऱ्यांचे उत्पादन करेल. यामुळे याबाबतीत भारताची स्वयंपूर्णता वाढेल आणि कॅमेऱ्यांच्या किमतीत मोठी घट होईल. सध्या या प्रकारच्या कॅमेऱ्यांची आयात किंमत २० लाख ते ४० लाख रुपये आहे; पण पारस डिफेन्सच्या उत्पादनामुळे त्यांची किंमत ६० टक्के कमी होईल, ज्यामुळे ही अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त प्रणाली भारतीय संरक्षण दल आणि व्यापारी वापरासाठी अधिक सुलभ होईल, असे पारस डिफेन्सचे व्यवस्थापकीय संचालक मुंजाल शरद शाह यांनी सांगितले.
...
देखरेख प्रणाली अधिक सक्षम होणार
हा करार दोन्ही कंपन्यांना भारतीय आयएसआर पेलोड बाजारपेठेत विस्तारित करण्यास मदत करेल. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषण, उच्च-रेझोल्युशन इमेजिंग आणि थर्मल व्हिजन यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या समावेशामुळे संरक्षण आणि नागरी क्षेत्रातील देखरेख प्रणाली अधिक सक्षम होणार आहे. भारतीय ड्रोन बाजार सध्या वेगाने विस्तारत आहे आणि हा सहयोग एक महत्त्वाची गरज पूर्ण करेल. सध्या ड्रोन कॅमेरे हे सर्वांत महागडे पेलोड्स असून ते आयात करावे लागतात. पारस डिफेन्स देशांतर्गत मागणी पूर्ण करेल आणि भारताला प्रगत तंत्रज्ञान उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनवण्याचे लक्ष्य गाठेल. भारतीय ड्रोन बाजार २०२९पर्यंत अंदाजे दरवर्षी १७ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. मुख्यतः संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्रात ड्रोनचा वापर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com