बनावट अहवालाद्वारे सात कोटींची फसवणूक

बनावट अहवालाद्वारे सात कोटींची फसवणूक
Published on

बनावट अहवालाद्वारे सात कोटींची फसवणूक

मुंबई, ता. ४ ः जागतिक पातळीवरील नामांकित आणि विश्वासार्ह प्रयोगशाळेचे बनावट अहवाल सादर करून आयात-निर्यात कंपनीची सात कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एसडीए इंडस्ट्रीचे मालक सागर आनंदपरा यांच्याविरोधात पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांस फार्मा कंपनीचे मालक नमित शहा यांनी दिलेल्या तक्रारीआधारे ही कारवाई करण्यात आली. न्यूझीलंड देशातील कुक्कुटपालनास आवश्यक खाद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीस शहा भारतातून कच्चा माल पुरवत होते. कच्च्या मालाचे एका प्रसिद्ध प्रयोगशाळेत मूल्यांकन करून ते मापदंडात बसत असेल तरच शहा तो विकत घेत आणि निर्यात करत. गेल्या वर्षी त्यांनी आरोपीच्या कंपनीकडून तब्बल ६.३१ कोटींचा माल घेतला आणि निर्यात केला. तो माल न्यूझीलंड येथील कंपनीने मापदंडात बसत नसल्याचे सांगत थांबवून ठेवला. ही बाब लक्षात येताच शहा यांनी चौकशी सुरू केली. त्यात आरोपी कंपनीने संबंधित प्रयोगशाळेचा बनावट अहवाल तयार करून त्याआधारे हा माल शहा यांच्या माथी मारल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय हा माल परदेशी पाठवण्यासाठी आलेला खर्च जोडून शहा यांनी आरोपीविरोधात ७.१४ कोटींच्या फसवणुकीचा आरोप केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com