अनंत अंबानी यांची १७० किलोमीटर धार्मिक पदयात्रा

अनंत अंबानी यांची १७० किलोमीटर धार्मिक पदयात्रा
Published on

अनंत अंबानी यांची १७० किलोमीटर धार्मिक पदयात्रा
मुंबई, ता. ४ : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत यांनी जामनगर ते द्वारका ही १७० किलोमीटरची पदयात्रा सुरू केली असून, ते रोज २० किलोमीटर चालून ८ एप्रिल रोजी द्वारका येथे ही पदयात्रा पूर्ण करतील. त्यांनी २९ मार्च रोजी ही पदयात्रा सुरू केली असून ते दर रात्री सात तास चालत आहेत. आपल्या तिसाव्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ते ही पदयात्रा पूर्ण करतील. अनेक ग्रामस्थही त्यांच्यासोबत काही वेळ या पदयात्रेत सहभागी होत आहेत.
या पदयात्रेदरम्यान अनंत अंबानी, हनुमान चालीसा, सुंदर कांड आणि देवीस्तोत्र म्हणत जातात. बद्रीनाथ, केदारनाथ, कामाख्या, नाथद्वारा, कालीघाट आणि कुंभमेळा येथेही अनंत अंबानी यांनी आवर्जून हजेरी लावली आहे. जामनगर येथील रिलायन्सचा जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठा स्वच्छ ऊर्जेचा प्रकल्प यांचे कामकाजही अनंत पाहत असतात. त्यांनी स्थापन केलेल्या गुजरातमधील वनतारा या पशु निवारा केंद्राचेही व्यवस्थापन ते बघतात. व्यवसाय आणि धार्मिक परंपरा यांची सांगड घालून त्यांनी सर्वांसमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केल्याचे यानिमित्ताने सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com