मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
Published on

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
कुर्ल्यात सिग्नल बिघाड

मुंबई, ता. ४ : कुर्ला स्थानकात आज संध्याकाळी सिग्नल यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. हा बिघाड तब्बल ४० मिनिटे कायम राहिल्याने गर्दीच्या वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत संध्याकाळी ७.१०च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या जागेवरच थांबल्या. अचानक झालेल्या खोळंब्यामुळे लोकल गाड्यांची रांग लागत गेली आणि प्रवासी लोकलमध्येच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने दुरुस्तीला सुरुवात केली. सुमारे ७.५० वाजता बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे सीएसएमटी, दादर, भायखळा, परळ, कुर्ला या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. लोकल १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com