मुंबईत आजपासून टँकर सेवा बंद

मुंबईत आजपासून टँकर सेवा बंद
Published on

मुंबईत आजपासून टँकरसेवा बंद
केंद्र सरकारच्या नियमावलीविरोधात टँकर संघटना आक्रमक
मुंबई, ता. ९ : मुंबईत १० एप्रिलपासून पाण्याची टँकरसेवा बंद होणार आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाने नवीन नियम लागू केल्यानंतर मुंबई महापालिकेने काढलेल्या नोटिशींच्या विरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. धरणांमध्ये केवळ ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मुंबईवर पाण्याचे संकट ओढवलेले असताना हा प्रकार घडला आहे. त्‍यामुळे पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेने लोकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून पाण्याचे संकट टाळता येईल. मुंबईतील टँकर व्यावसायिकांना महापालिकेने नोटीस जारी केली असून, मुंबईतील विहीर आणि बोअरवेल मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार एनओसी घ्यावी लागेल अन्यथा पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असे बजावले आहे. बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याचे आढळून आले असल्याने त्यांना आता पाणीपुरवठा करता येणार नाही. या चिंतेमुळे मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशनने या निर्णयाच्या निषेधार्थ पाण्याची टँकरसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई टँकर असोसिएशनचे अंकुर शर्मा यांनी सांगितले, की मुंबईत गेल्या ८० वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पालिकेने टँकरसेवा बंद केल्यास मुंबईकरांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. केंद्रीय भूजल प्राधिकरणाची नियमावली ही पुण्याच्या पाण्यासंदर्भात आहे, मात्र आम्ही पिण्याशिवाय बांधकाम व्यावसायिक आणि इतर कामांसाठी पाणीपुरवठा करतो. त्यामुळे ती नियमावली आमच्यासाठी शिथिल करावी, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com