कोण आहे राणा?

कोण आहे राणा?
Published on

कोण आहे राणा?
- पाकिस्तानमध्ये जन्मलेला राणा आणि हेडली बालपणीचे मित्र आहेत. त्यांचे शिक्षण एकाच शाळेत झाले. पुढे हेडली आई-वडिलांसोबत अमेरिकेत स्थायिक झाला तर, राणा पाकिस्तानी लष्करात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला. १९९७ मध्ये राणा डॉक्टर पत्नीसोबत कॅनडा येथे स्थायिक झाला. २००१ मध्ये राणा दाम्पत्याला तेथील नागरिकत्व प्राप्त झाले.

गुन्ह्यातील सहभाग
- हेडलीचे वडील पाकिस्तानी तर, आई अमेरिकन नागरिक होती. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर हेडली येथील तपास यंत्रणांना आशियाई देशांतून होणाऱ्या अमली पदार्थ तस्करी, तस्करांबाबत गोपनीय माहिती पुरवत असे. प्रत्यक्षात तो एकाचवेळी अमेरिका आणि पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनांच्या संपर्कात (डबल एजंट) होता.

हेडलीस सर्वतोपरी सहकार्य
- पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेस हाताशी धरून मुंबई हल्ल्याचा कट आखला. ‘फॉरेनर लूक’मुळे हेडलीवर मुंबई हल्ल्यासाठी संभाव्य ठिकाणे निवडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. भारतात वास्तव्यासाठी हेडलीने बालपणीचा मित्र राणाची मदत घेतली. राणाने फस्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिस या नावे चार देशांत केंद्र सुरू केली. त्यातील एक केंद्र हेतुपुरस्सर मुंबईत सुरू करण्यात आले. या व्यवसायात भागीदार असल्याचे भासवून हेडली हल्ल्यापूर्वी आठ वेळा मुंबईत आला. त्याने याच व्यवसायाच्या नावे व्हिजिटिंग कार्ड छापून घेतले होते. या व्यवसायाआड हेडलीने अधिकाधिक मनुष्यहानी होईल, या उद्देशाने हल्ल्यासाठी ठिकाणे निवडली. या कृतीत राणा याने हेडलीस सर्वतोपरी सहकार्य केले.
राणा आणि हेडली यांच्या मुंबईतील वास्तव्यात दोघांमध्ये २३१ वेळा फोनवर बोलणे झाले. त्यापैकी हल्ल्याच्या आधी केलेल्या मुंबईतील वास्तव्यात दोघांमध्ये सर्वाधिक ६६ वेळा बोलणे झाल्याचा दावा एनआयएने प्रत्यर्पणासाठी अमेरिकेकडे सुपूर्द केलेल्या कागदपत्रांमध्ये केला होता.


चौकशीतून काय निष्पन्न होणार?
- हल्ल्यानंतर अतिरेकी अजमल कसाबची चौकशी, त्याने आणि अन्य साथीदारांनी सोबत आणलेला शस्त्रसाठा, प्रत्येक वस्तूची डीएनए चाचणी, अतिरेकी व त्यांच्या म्होरक्यातील संवाद यावरून मुंबई गुन्हे शाखेने हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत होता, हे जगासमोर आणले होते. आता राणाच्या या हल्ल्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी पाकिस्तानी लष्कर, आयएसआय अधिकारी, लष्कर ए तोयबा आणि हरकते उल जिहादे इस्लामी या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे भारतातील पाठीराखे, स्लीपर सेल याबाबत महत्त्वाची माहिती पुढे येऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com