

राज्यात डेंगी, मलेरिया वाढला
मुंबईत आढळले सर्वाधिक रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : राज्यात गेल्या तीन महिन्यांत डासांचा डंख सुरूच आहे. तीन महिन्यांत मलेरियाचे एक हजार १३८ रुग्ण तर डेंगीचे ८१२ रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुनियाचे ५०७ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील शहरी भागातील मलेरिया, डेंगी, चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आहेत.
राज्यात १४ जानेवारीपर्यंत मलेरियाचे ४०१ रुग्ण आहेत. तर डेंगीचे २१० रुग्ण आहेत. त्यानंतर गेल्या अडीच महिन्यांत मलेरियाचे रुग्ण दुप्पट झाले. तर डेंगीच्या रुग्णसंख्येत पाच पटीने वाढ झाली आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये मलेरियाचे गडचिरोलीमध्ये ६४४, रायगडमध्ये ९०, गोंदियात ११, ठाणे सात रुग्ण आढळले आहेत. महापालिकांमध्ये मुंबईत १०२, पनवेलमध्ये ११०, ठाण्यात ६८, कल्याण व मिरा भाईंदरमध्ये प्रत्येकी २५ रुग्ण आढळले आहेत.
राज्यातील जिल्ह्यामध्ये डेंगीचे पालघरमध्ये ७७, पुणे ७१, अकोला ६२, सिंधुदुर्ग ५६ रुग्ण आढळले आहेत. महापालिकांमध्ये मुंबई २२१, नाशिक ९०, अकोला ६९, मालेगाव ५४ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील जिल्ह्यांमध्ये चिकुनगुनियाचे पुण्यात ६०, अकोला ५०, सिंधुदुर्ग ४३, पालघर ३४ रुग्ण आढळले आहेत. तर महापालिकांमध्ये मुंबई ९४, अकोला ६४, सांगली- मिरज १८, नाशिकमध्ये १७ रुग्ण आढळले आहेत.
मलेरियाचे रुग्ण सामान्यत: पावसाळ्याच्या म्हणजेच जुलै ते ऑक्टोबर आणि डेंगीचे रुग्ण सामान्यत: ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यांत वाढतात. तापमान, आर्द्रता आणि अधूनमधून पडणारा पाऊस यांसारख्या हवामानाच्या परिस्थितीमुळे डासांची पैदास होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.