मुंबईत पावसाची शक्यता
मुंबईत पावसाची शक्यता
मुंबई, ता. १३ : राज्यात काही ठिकाणी उन्हाच्या झळा वाढल्या असताना काही ठिकाणी मात्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात मुंबईतदेखील पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पुढील दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. यात काही ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांकडे जात असताना काही परिसरामध्ये मात्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, मुंबईतही पुढील एक ते दोन दिवसांत हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत वातावरणही ढगाळ राहील, त्यामुळे काहीसा उकाडाही जाणवेल. यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

