मालवणीतील ५१ एकरावरील झोपडपट्टीचा कायापालट
मालवणीतील ५१ एकरावरील झोपडपट्टीचा कायापालट
- म्हाडाकडून वास्तुविशारद आणि प्रकल्प सल्लागार नियुक्त करणार; - १४ हजार झोपडीधारकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मालवणी येथील ५१ एकरावर पसरलेल्या राजीव गांधी नगरातील झोपड्यांचा आता कायापालट होणार आहे. विकसकाच्या नाकर्तेपणामुळे वर्षानुवर्षे रखडलेला झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प एसआरए प्राधिकरणाने म्हाडाला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने पुनर्विकास प्रकल्पाला चालना दिली असून, वास्तुविशारद आणि प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील सुमारे १४ हजार झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, म्हाडालाही अतिरिक्त घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेशातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळावी, यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार एसआरएकडून म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, महापालिका अशा वेगवेगळ्या आस्थापनांना पूर्ण करण्यासाठी दिले जात आहे. त्यानुसार म्हाडाच्या जमिनीवरील रखडलेल्या १७ प्रकल्पांचा पुनर्विकास म्हाडा आणि एसआरए यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वावर केला जाणार आहे. त्यामुळे २५ हजारांहून अधिक झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार आहे.
या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सर्वात मोठा प्रकल्प मालवणीच्या राजीव गांधी नगर येथे असून, त्यामध्ये १४ हजार झोपड्या आहेत. यासाठी आवश्यक असलेले वास्तुविशारद आणि प्रकल्प सल्लागार यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यानंतर प्रकल्पाचे चित्र समोर येणार आहे.
एसआरएच्या नियमानुसार घरे मिळणार
म्हाडाने मालवणीतील रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, पीएमसी आणि आर्किटेक्टची नेमणूक करणार आहे. त्यानंतर विकसक नेमून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. या झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण म्हाडाच करणार असून, त्यांना एसआरएच्या नियमानुसार घरे दिली जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

