रखडलेल्या प्रकल्पांचे अडथळे दूर करणार
रखडलेल्या प्रकल्पांचे अडथळे दूर करणार
इक्बाल सिंह चहल यांची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः मुंबईतील नागरी सेवासुविधांचा स्तर अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार येतील. राज्य शासन, महापालिका आणि विविध प्राधिकरणांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून काही अडचणींमुळे रखडलेल्या प्रकल्पांचे अडथळे दूर करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालक सचिव इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
जिल्हा विविध क्षेत्रांत अग्रेसर ठेवण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुकर होण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने सातत्याने प्रयत्न करावेत यासाठी समन्वयक म्हणून राज्य शासनाने पालक सचिवांची नेमणूक केली आहे. त्याअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्याच्या पालक सचिव पदाची जबाबदारी राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंह चहल हे सांभाळत आहेत. यासंदर्भात विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी चहल यांनी आज मुंबई मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीस पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, तसेच संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त; महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए.), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आदी प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए यांचे रखडलेले प्रकल्प, देवनार प्रकल्प, गृहनिर्माण प्रकल्प, पोलिस वसाहतींचा पुनर्विकास यावर सकारात्मक चर्चा झाली. पावसाळ्यात डोंगरकड्यांच्या भागांतील संभाव्य भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि उपाययोजनांसाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही चहल यांनी स्पष्ट केले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी बीडीडी चाळ आणि कामाठीपुरा प्रकल्पांचे मुद्दे मांडले. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मेट्रो प्रकल्पाविषयी माहिती दिली.
...
समन्वयासाठी बैठक
पालिका व विविध प्राधिकरणांचे प्रकल्प आणि योजना एकमेकांच्या परवानगीवर अवलंबून असतात. त्यामुळे या परवानग्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत चर्चा झालेले मुद्दे आणि संबंधित विभागांमधील समन्वयासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

