

बेस्ट वाचविण्यासाठी पुढाकार घ्या!
‘मुंबई आमची बेस्ट आमची’ संघटनेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्त बेस्टवरील आर्थिक संकट दूर करण्याऐवजी बेस्ट उपक्रम कंत्राटदारांवर सोपवून जबाबदारी टाळत आहेत. खासगीकरणाने बेस्ट उपक्रमाचे आणि प्रवाशांचे नुकसान होत असून बेस्टची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत आहे. त्यामुळे बेस्ट वाचविण्यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई आमची बेस्ट आमची संघटनेने जनसुनावणीवेळी केले आहे.
‘बेस्टवरील संकट’ या विषयावर आमची मुंबई आमची बेस्ट या संघटनेतर्फे शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. २०१७पासून बेस्ट व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनाने असक्षम केली आहे. बेस्ट ही सार्वजनिक सेवा अधिक बळकट करण्यासाठी बेस्ट आणि पालिका प्रशासनाने अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. कोणतीही उपाययोजना न करता बेस्ट कंत्राटदारांच्या हाती सोपवून बेस्ट उपक्रमाने आपली जबाबदारी झटकली आहे, असे स्पष्ट केले आहे.
बेस्ट उपक्रम कंत्राटदारांच्या हाती सोपविल्यामुळे बेस्ट गाड्यांचे पूर्ण नुकसान झाले आहे. बेस्टच्या कंत्राटी कामगारांना वेतन वेळेवर मिळत नाही. गाड्यांची देखभाल व्यवस्थित होत नाही. बस वेळेत सोडल्या जात नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. बेस्ट ही सर्वोत्तम आहे. बेस्ट उपक्रम वाचावी, तो सक्षम व्हावा, बेस्टच्या मालकीच्या बस असाव्यात, यासाठी आमची मुंबई ही संघटना लढत आहे. त्यासाठी प्रतीकात्मक जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत नागरिकांनी आपली मते मांडली. सुनावणीत पॅनलवर ॲड. गायत्री सिंह, प्रा. संजीव चांदोरकर, रंगनाथ सातवसे, पत्रकार योगेश पवार, वरिष्ठ पत्रकार अनिल सिंह आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.