अक्षय शिंदे प्रकरण गुन्हे शाखेकडे सुपूर्द

अक्षय शिंदे प्रकरण
गुन्हे शाखेकडे सुपूर्द
Published on

अक्षय शिंदे प्रकरण
गुन्हे शाखेकडे सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः बहुचर्चित बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूशी संबंधित आतापर्यंत केलेला तपास राज्य अन्वेषण विभागाने (सीआयडी) शुक्रवारी संध्याकाळी मुंबई गुन्हे शाखेला सुपूर्द केला. कागदपत्रांचे अवलोकन करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
तळोजा कारागृहातून ठाण्याला नेताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला होता; मात्र न्यायालयीन चौकशीदरम्यान ही घटना टाळता आली असती, असे निरीक्षण नोंदवत ही चकमक खोटी होती, असा निष्कर्ष निघाला. अलीकडेच या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. ललिता कुमारी खटल्याच्या निकालाप्रमाणे विशेष तपास पथकाने तपास पुढे न्यावा, असे न्यायालयाने म्हटल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे या पथकाचे प्रमुख असून सहआयुक्त लखमी गौतम कामकाजावर देखरेख ठेवतील.
---
न्यायालयाकडून फटकार
दरम्यान, हे आदेश दिल्यानंतर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही, अशी विचारणा न्यायालयाने शुक्रवारी केली. त्यावर गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्या वतीने अद्याप सीआयडीकडून तपासाशी संबंधित कागदपत्रे मिळाली नाहीत, असे सांगताच न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायालयाने शासन, सीआयडी आणि गुन्हे शाखेला फटकारताच सीआयडीने कागदपत्रे गुन्हे शाखेकडे सुपूर्द केली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com