गृहनिर्मितीत महाराष्ट्र पहिल्‍या क्रमांकावर!

गृहनिर्मितीत महाराष्ट्र पहिल्‍या क्रमांकावर!

Published on

गृहनिर्मितीत महाराष्ट्र पहिल्‍या क्रमांकावर!
- महारेराकडे सर्वाधिक ५० हजार १६२ प्रकल्पांची नोंद; मुंबईत ७,१९१ प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : सर्वसामान्यांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी देशभरातील विविध राज्यांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. तरीही गृहनिर्माण प्रकल्पांत आणि गृहनिर्मितीत महाराष्ट्र देशात पहिल्‍या क्रमांकावर आहे. देशात एकूण एक लाख ४४ हजार ७१७ नोंदणीकृत गृहनिर्माण प्रकल्प आहेत. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रात ३५ टक्के म्हणजे ५० हजार १६२ महारेराकडे नोंदणीकृत प्रकल्प आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या तमिळनाडूत २७ हजार ६०२ प्रकल्प आहेत. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांत सात हजार १९१ प्रकल्प आहेत.
गृहनिर्माण क्षेत्रावर अंकुश ठेवण्याबरोबरच सामन्यांची घर खरेदी करताना फसवणूक होऊ नये, यासाठी केंद्राने सर्वच राज्यांना रेरा प्राधिकरणाची स्थापना करण्याचे निर्देश २०१६ च्या सुमारास दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या महारेरा प्राधिकरणाने नुकतेच नवव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानुसार महारेराकडे आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे ५० हजार गृहनिर्माण प्रकल्पांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र पाहिले राज्य ठरले आहे.
सध्या महारेराकडे एकूण ५० हजार १६२ गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीकृत आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील राज्यांत आणि महाराष्ट्रात मोठी तफावत आहे. तमिळनाडू दुसऱ्या स्थानावर असून, तेथे २७ हजार ६०९ गृहनिर्माण प्रकल्प आहेत, तर गुजरात १५ हजार ३३२ प्रकल्पांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या तीनच राज्यात पाच आकडी गृहनिर्माण प्रकल्प असून, इतर राज्यांतील संख्या तुलनेने नगण्य आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रकल्प
राज्यातील एकूण ५० हजार १६२ प्रकल्पांपैकी सर्वाधिक १२ हजार ७८८ गृहनिर्माण प्रकल्प एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ६७४६, मुंबई उपनगरात ५९०७, रायगड जिल्ह्यातील ५३६० अशी प्रकल्पांची संख्या आहे.

जिल्हानिहाय प्रकल्प
मुंबई शहर- १,२८४
मुंबई उपनगर- ५,९०७
ठाणे- ६,७४६
रायगड- ५,३६०
पालघर- २,८९९
रत्नागिरी- १,०८७
सिंधुदुर्ग- ४७८

- कोकण विभाग - २३७७०
- पुणे विभाग - १५९३२
- उत्तर महाराष्ट्र विभाग - ४६२१
- नागपूर विभाग - २६६४
- छत्रपती संभाजीनगर - १८८६
- अमरावती विभाग - ९५७

महारेराकडे गेल्या आठ वर्षांत नोंदवलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या ५० हजारांच्या वर गेली आहे. उद्योगस्नेही, सतत प्रगतिपथावर असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने ही नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद बाब आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई महानगर किंवा पुणे परिसरापुरते काही प्रमाणात मर्यादित असलेले स्थावर संपदा क्षेत्र आता राज्यात सर्वत्र विस्तारते आहे.
- मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com