म्हाडाच्या कोकण मंडळाची घरांची जुलैमध्ये बंपर लॉटरी
म्हाडाच्या कोकण मंडळाची घरांची जुलैमध्ये बंपर लॉटरी
म्हाडाच्या कोकण मंडळाची घरांची जुलैमध्ये बंपर लॉटरी

म्हाडाच्या कोकण मंडळाची घरांची जुलैमध्ये बंपर लॉटरी म्हाडाच्या कोकण मंडळाची घरांची जुलैमध्ये बंपर लॉटरी म्हाडाच्या कोकण मंडळाची घरांची जुलैमध्ये बंपर लॉटरी

Published on

म्हाडाच्या कोकण मंडळाची घरांची जुलैमध्ये बंपर लॉटरी
चार हजार घरांचा समावेश असणार; ठाणे, कल्याणमध्ये सर्वाधिक घरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आता जुलैमध्ये चार हजारांहून अधिक घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे. यामध्ये म्हाडाने ठाणे चितळसर येथे उभारलेल्या एक हजार २०० तर कल्याण येथे खासगी विकसकांकडून २० टक्क्यांतर्गत मिळणाऱ्या सुमारे दोन हजार ५०० हजार घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना आपले नशीब आजमावता येणार आहे.
कोकण मंडळातर्फे जानेवारीत काढलेल्या दोन हजार २६४ सदनिकांच्या लॉटरीसाठी जवळपास २९ हजार अर्ज आले होते. यावरून ठाणे, कल्याण परिसरातील घरांना मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे म्हाडाच्या कोकण मंडळाने जुलै अखेरपर्यंत चार हजारांहून अधिक घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
या लॉटरीत म्हाडाच्या चितळसर ठाणे येथे बांधून तयार असलेल्या एक हजार २०० घरांचा समावेश केला जाणार आहे. तसेच कल्याण येथे एकाच खासगी विकसकाकडून म्हाडाला दोन हजार ५०० हजार घरे उपलब्ध होणार आहेत. सदर घरांचे काम सुरू असून, पुढील दोन महिन्यांत त्याचा आढावा घेऊन लॉटरीत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे ठाण्यात म्हाडाच्या लॉटरीअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत.

चितळसरसाठी अमृत योजनेंतर्गत महापालिका पाण्याची टाकी बांधणार
म्हाडाची चितळसर येथे म्हाडाची एक हजार २०० घरे बांधून तयार आहेत, मात्र ही घरे उंचावर असल्याने आतापर्यंत या घरांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी या प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर म्हाडा आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून, सदर प्रकल्पासाठी अमृत योजनेंतर्गत महापालिका पाण्याची टाकी बांधणार आहे. तोपर्यंत येथील घरांना पाणीपुरवठा करण्यासाठी तात्पुरती जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

वाढीव किमतीबाबत स्पष्टता आणणार
म्हाडाला खासगी विकसकांकडून २० टक्क्यांतर्गत मिळणाऱ्या घरांची लॉटरीमध्ये एक किंमत असते, मात्र लॉटरी निघाल्यानंतर विजेते विकसकांकडे गेल्यानंतर लॉटरीतील किमतीच्या तुलनेत सात-आठ लाख रुपये वेगवेगळ्या चार्जेसपोटी लावले जातात. त्यामुळे सदरचे घर आवाक्याबाहेर जाते. त्यामुळे विकसकांनी कोणते चार्जेस लावावेत, कोणते लावून नयेत याबाबत म्हाडाकडून लवकरच स्पष्टता आणली जाणार आहे. त्यामुळे लॉटरी विजेत्यांना लागणार वाढीव भुर्दंड काहीसा हलका होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com