पश्चिम उपनगरात सर्वाधिक धोकादायक इमारती
पश्चिम उपनगरात सर्वाधिक धोकादायक इमारती
अवैध बांधकामांचा फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईतील १३५ अतिधोकादायक इमारतींची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. त्यातील सर्वाधिक ८० इमारती पश्चिम उपनगरात आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध बांधकामामुळे धोकादायक इमारतींचा आकडा वाढल्याचे बोलले जात आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिका हद्दीतील १३५ इमारतींची यादी जाहीर करीत नागरिकांना आवश्यक सूचना केल्या आहेत. मुसळधार पावसात जीर्ण अतिधोकादायक इमारती कोसळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे महापालिका आवश्यक ती खबरदारी घेत आहे. महापालिकेने आपल्या अधिकार क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी सूचना जाहीर केल्या आहेत. महापालिका अधिनियम, १८८८चे कलम ३५४च्या तरतुदीअन्वये महापालिका क्षेत्रातील इमारतींना ‘अतिधोकादायक’ घोषित करण्यात आलेले आहे. तरीदेखील काही इमारतींमध्ये अजूनही नागरिक वास्तव्यास आहेत.
इमारत कोसळून काही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित व वित्तहानी झाल्यास त्याबाबतची जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या संबंधित नागरिकांची व संबंधित सक्षम प्राधिकरणाची राहील, त्यासाठी महापालिका जबाबदार राहणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील एकूण धोकादायक इमारती - १३५
पश्चिम उपनगर - ८०
शहर - २८
पूर्व उपनगर - २७
अतिधोकादायक इमारतींमधील प्राथमिक लक्षणे
१. इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम, कॉलम, बीम, स्लॅब इत्यादींच्या रचनेत बदल
२. तळमजल्याचा भाग खचल्यासारखा वाटणे
३. कॉलममधील वाढत्या भेगा, काँक्रीट पडणे
५. इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखा दिसणे
६. कॉलम, बीम्स व विटांची भिंत यातील सांधा-भेगा वाढणे
७. स्लॅबचे किंवा बीमचे तळमजल्याचे काँक्रीट पडणे, प्लास्टरमध्ये भेगा
९. इमारतीच्या काही भागात विशिष्ट आवाज
१०. लोखंडी शिगांचा आकार गंजल्यामुळे कमी होणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.