भूकंप, रेल्वे बफरच्या आघातापासून मिळणार संरक्षण
भूकंप, रेल्वे बफरच्या आघातापासून मिळणार संरक्षण
आयआयटी मुंबईतील संशोधकांचे टाकाऊ टायरपासून नवे संशोधन
मुंबई, ता. १८ ः प्रदूषित पर्यावरणामुळे निर्माण झालेले ताण, क्लोराईडच्या शिरकाव्याशी सामना करणाऱ्या किनाऱ्यावरील अथवा सागरी संरचना आणि रेल्वे बफर किंवा भूकंपप्रवण संरचना यासारख्या आघात शोषून घेत त्यातून संरक्षण देणारे गुणधर्म असलेल्या भिंतीचे एक नवे संशोधन आयआयटी मुंबईतील संशोधकांनी केले आहे. यात टाकाऊ टायरमधील रबरांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
हरित काँक्रीट रबर आणि काँक्रीटची विलक्षण जोडी विकसित करण्यात आली असल्याने येत्या काळात बांधकाम क्षेत्रासाठी ही सर्वांत सुरक्षित प्रणाली ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. या संशोधनामुळे पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात संरक्षण होणार असल्याचे निरीक्षण या संशोधनातून नोंदविण्यात आले आहे.
जगातील संशोधक काँक्रीटमधील वाळू आणि रेती (खडी) यासारख्या नैसर्गिक घटकांऐवजी (ॲग्रिगेट : काँक्रीटमधील स्थूल पदार्थ) टाकाऊ रबराचे तुकडे (२५-३० मिमी आकाराचे) वापरण्याचे मार्ग शोधत आहेत. या तुकड्यांना ‘वेसरब’ असे टोपणनाव दिले आहे. यातून तयार होणाऱ्या पदार्थाला रबक्रीट म्हणतात. ही पद्धत त्रासदायक कचऱ्याचा सदुपयोग करते आणि त्याचबरोबर सामान्यपणे काँक्रीटमध्ये वापरले जाणारे नैसर्गिक दगड आणि वाळू खाणीतून काढण्याची गरज कमी करते. योग्य मिश्रण मिळवण्यासाठी घटक पदार्थांची परस्पर क्रिया, विशेषतः सूक्ष्म स्तरावरील परस्पर क्रिया तंतोतंत घेण्यासाठीचे हे संशोधन आयआयटी मुंबईतील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्रा. डी. एन. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यात रबक्रीटमधील आयटीझेड समजून घेण्यासाठी रबराचे कण आणि आजूबाजूचे सिमेंट यातील सूक्ष्म जोड झूम करून तपशीलवार अभ्यास करण्यात आला.
टायरची पुनःप्रक्रिया करणारा सर्वात मोठा देश
भारत जगातील स्वयंचलित वाहनांची तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. त्यामुळे वर्षाकाठी २५ लाख मेट्रिक टन टायरची निर्मिती होते. ही वाढ टाकाऊ टायर्सची वाढती संख्या दर्शविते. ही एकूण नागरी घनकचऱ्याच्या एक टक्के असून, वर्षाला २० लाख मेट्रिक टन टायर्स भंगारात फेकले जातात. भारत जगातील सर्वात मोठा टायरची पुनःप्रक्रिया करणारा देश असून, भारतात ८०० नोंदणीकृत पुनः प्रक्रिया केंद्रे आहेत. हा आकडा जगातील पुनःप्रक्रिया करणाऱ्या केंद्रांच्या ७० टक्के आहे. बरेच पुनःप्रक्रिया करणारे बेकायदा टायर जाळतात किंवा फेकून देतात. फेकलेल्या टायर्सचे हे ढीग पर्यावरणास धोका ठरतात. त्या माध्यमातून विषारी धूर बाहेर पडताे.
रबक्रीट नैसर्गिक काँक्रीटपेक्षा अधिक नरम
रबर त्याच्या पृष्ठभागावरील पाणीसुद्धा दूर लोटते, जे सिमेंटच्या सजलीकरणासाठी, रासायनिक क्रियेसाठी आणि टणक होण्यासाठी आवश्यक असते. रबराच्या पृष्ठभागावर जमा होणारे हे पाणी रासायनिक क्रियेची तीव्रता कमी करते. म्हणून त्याला विरलीकरण परिणाम म्हणतात. रबक्रीट नैसर्गिक काँक्रीटपेक्षा अधिक नरम होईल, येथेच रबक्रीटचे आव्हान आणि संधी दडलेली आहे, असे संशोधकांनी सांगितले.
असे होतील लाभ
रबक्रीटची अवमंदन आणि लवचिकता, त्याचा पर्यावरणीय ताणांना (औष्णिक व रासायनिक) असणारा प्रतिकार यामुळे रबक्रीटला मजबुती प्राप्त होते. रस्त्यातील अटकाव आणि तापमानातील बदलांना सामोरे जाणारे रस्ते, क्लोराईडच्या शिरकावाशी सामना करणाऱ्या किनाऱ्यावरील अथवा सागरी संरचना आणि रेल्वे बफर किंवा भूकंपप्रवण संरचना यासारखे आघात शोषून घेणाऱ्या प्रणाली (शॉक ॲबसॉर्बिंग) या उपयोगांमध्ये रबक्रीटचा त्वरित फायदा होऊ शकतो.
अधिक टिकाऊ बांधकामाचा मार्ग
रबक्रीट जुन्या टायर्सच्या पुनःप्रक्रियेचा फक्त एक मार्ग नाही, तर स्मार्ट आणि अधिक टिकाऊ बांधकाम साहित्य बनवण्याचा एक संभाव्य मार्ग आहे. ते तीव्र परिस्थितीमधील आव्हानाला विलक्षण अनुरूप आहे. पर्यावरणीय प्रतिकूलतेच्या पार्श्वभूमीवर हरित आणि मजबूत बांधकामासाठी उपयुक्त असेल, असे संशोधकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.