सायन रुग्णालयातर्फे लहान मुलांसाठी खेड्या-पाड्यात शिबिर

सायन रुग्णालयातर्फे लहान मुलांसाठी खेड्या-पाड्यात शिबिर
Published on

सायन रुग्णालयातर्फे लहान मुलांसाठी खेड्या-पाड्यात शिबिर
तीन हजारांहून अधिक मुलांचे स्क्रीनिंग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू मुलांसाठी पालिकेच्या सायन रुग्णालयाच्या पेडियाट्रिक सर्जरी विभागातर्फे सातारापासून सावंतवाडीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या विशेष शस्त्रक्रिया कॅम्पद्वारे आजवर सुमारे ३,३०० मुलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २,८५० हून अधिक मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
सातारा, रत्नागिरी, शाहपूर, पनवेल, पालघर, जव्हार, डहाणू, बारामती आणि सावंतवाडी अशा विविध भागांमध्ये हे कॅम्प्स आयोजित करण्यात आले. शाळकरी वयातील मुलांच्या तपासणीसाठी स्थानिक प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी पुढाकार घेऊन आपल्या शाळेतील आजारी मुलांना तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर गरजेनुसार संबंधित मुलांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
या कॅम्पमध्ये सायन रुग्णालयातील पेडियाट्रिक सर्जन डॉ. पारस कोठारी आणि डॉ. शहाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक समन्वयक, एक स्पेशालिटी नर्स, चार सर्जन आणि एक भूलतज्ज्ञ यांचा समावेश असलेली टीम काम करते. या मोहिमेदरम्यान हर्निया, हायड्रोसिल, सर्कमसिझन, हायपोसपेडियास, सिस्ट्स, लिपोमा, गँग्लिअन, सिंडॅक्टली, टंग टाय, नाभीशोथ इत्यादी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
कॅम्पमध्ये केवळ बालशस्त्रचिकित्सकच नव्हे तर ईएनटी, कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ अशा विविध शाखांचे डॉक्टरही सहभागी झाले. प्रत्येक कॅम्पमध्ये १० ते १२ जटिल व दुर्मिळ आजारांच्या रुग्णांची नोंद होते आणि अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात बोलावले जाते.
या संपूर्ण उपक्रमात स्थानिक आमदार, खासदा, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे महत्त्वाचे योगदान लाभले आहे. प्रत्येक मुलाची प्राथमिक तपासणी करून, आजाराच्या गंभीरतेनुसार प्राधान्य देत नियोजनबद्धपणे शस्त्रक्रिया केली जाते, असे डॉ. कोठारी आणि डॉ. देशमुख यांनी सांगितले. हा उपक्रम ग्रामीण भागातील गरजू मुलांसाठी मोठा आधार ठरत असून, या माध्यमातून हजारो कुटुंबांना नवजीवन लाभले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com