कंपनीचा सर्व्हर हॅक करून खंडणीची मागणी

कंपनीचा सर्व्हर हॅक करून खंडणीची मागणी
Published on

कंपनीचा सर्व्हर हॅक करून खंडणीची मागणी

मुंबई : एका जाहिरात कंपनीचा सर्व्हर हॅक करून महत्त्वपूर्ण डेटा गायब करून हा डेटा परत हवा असल्यास कंपनीकडे बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. अलकेमिस्ट मार्केटिंग टॅलेंट सोल्युशन या कंपनीसोबत हा प्रकार घडला. ३ मे रोजी कंपनीला सर्व्हरवर लॉगइन करता आले नाही. पासवर्ड बदलून प्रयत्न केला असता कंपनीचा संपूर्ण डेटा गायब झाल्याचे आढळले. त्याऐवजी सर्व्हरमध्ये एक टेक्स्ट फाइल आढळली. त्यात पुढील चार दिवसांत ०.०५२ बिटकॉइन (४.१२ लाख) न दिल्यास हा डेटा कायमचा डिलीट होईल, अशी धमकी देण्यात आली होती. कंपनीने प्रथम सायबर तज्ञांकडून सल्ला घेतला; तेव्हा कंपनीचा सर्व्हर हॅक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कंपनीने तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com