

कर्नाक पुलाचे काम पूर्ण
लवकरच वाहतुकीस होणार खुला; दळणवळणाला गती मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मशीद बंदर रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेला आणि पी. डी''मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे आटोक्यात आली आहेत. वाहतूक विभागासमवेत समन्वय साधून लवकरच हे दोन्ही पूल वाहतुकीस खुले करण्यात येणार असून, यामुळे मुंबईतील दळणवळणाला अधिक गती मिळणार आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी पूल विभागाच्या समन्वयाने कर्नाक पूल आणि विक्रोळी पूल या दोन्हीही पुलांची उभारणी, स्थापत्य कामे व इतर संबंधित कामांची कालमर्यादा निश्चित केली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून कामांना अधिक वेग आला आहे. तसेच बांगर यांनी गुरुवारी रात्री कर्नाक पूल प्रकल्पस्थळास भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला.
-------------------------
पालिकेकडून पुनर्बांधणी
पुलाविषयी बोलताना बांगर म्हणाले, ‘मध्य रेल्वेने धोकादायक घोषित केलेल्या कर्नाक पुलाची पुनर्बांधणी महापालिकेने केली आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. पुलाची लांबी रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर तर पूर्व बाजूला (पी. डी''मेलो मार्ग) १५५ मीटर, पश्चिम बाजूला (मोहम्मद अली मार्ग) २५५ मीटर इतकी आहे.
------------------------------
क्युरिंग कालावधी सुरू
सद्य:स्थितीत कर्नाक पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग पूर्ण झाले आहेत. पश्चिमेकडील डेक स्लॅबचे कामदेखील पूर्ण झाले आहे. पूर्व बाजूकडील ८० पैकी ४० मीटर लांबीच्या डेक स्लॅबचे काम पूर्ण झाले असून, त्याचा क्युरिंग कालावधी सुरू आहे. उर्वरित ४० मीटर अंतरासाठी अर्ली स्ट्रेन्थ काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरून ५ जूनपर्यंत क्युरिंग कालावधी पूर्ण होणार आहे.
---------------------
वेळ ३० मिनिटांनी कमी
अभिजित बांगर यांनी विक्रोळी उड्डाणपुलाचाही आढावा घेतला. या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे. पश्चिम दिशेकडील मास्टिक अस्फाल्टचे काम सुरू आहे. ३१ मे २०२५ पर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्धारित उद्दिष्ट साध्य होणार आहे.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.