सीबीएसई शाळांमध्ये मातृभाषा अनिवार्य

सीबीएसई शाळांमध्ये 
मातृभाषा अनिवार्य
Published on

सीबीएसई शाळांमध्ये मातृभाषा अनिवार्य
भाषा शिक्षणाचे धोरण जारी
मुंबई, ता. २४ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) देशभरातील आपल्या सर्व शाळांमध्ये भाषा शिक्षणविषयक धोरण जारी केले आहे. त्यानुसार सीबीएसई शाळांमध्ये पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकविणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) २०२३च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सीबीएसईने सर्व संलग्न शाळांना पूर्व-प्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत स्तरावर दोन भाषांपैकी एक म्हणून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जाणार आहे. राज्यातील बहुतेक सीबीएसई शाळांनी इंग्रजीसह हिंदी ही दुसरी भाषा म्हणून पर्याय दिला होता; मात्र आता राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० नुसार, संज्ञानात्मक आणि भावनिक विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण घेण्यावर भर दिला आहे.
सीबीएसईच्या परिपत्रकानुसार, प्राथमिक भाषा ही विद्यार्थ्यास सर्वाधिक परिचित म्हणजेच मातृभाषा असावी. शक्य नसल्यास राज्यभाषा वापरली पाहिजे. मुलाला दुसऱ्या भाषेत मूलभूत साक्षरता येईपर्यंत ही भाषा सर्व विषयांसाठी शिक्षणाचे माध्यम म्हणूनदेखील काम करेल, असे नमूद केले आहे. या शाळांना मेअखेरीस मातृभाषेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करावी लागेल. ही समिती विद्यार्थ्यांच्या भाषिक पार्श्वभूमीचे मूल्यांकन करेल, अभ्यासक्रमात आवश्यक बदल करेल आणि योग्य शिक्षण साहित्य निवडण्यासाठी मार्गदर्शन करेल. शिक्षकांनी जुलैपर्यंत बहुभाषिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षणदेखील पूर्ण केले पाहिजे. तसेच तीन ते आठ वयोगटातील मुलांना त्यांच्या मातृभाषेत मूलभूत साक्षरता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
---
आदेशातील मुख्य मुद्दे :
- पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंत मुलांच्या शिक्षणासाठी मातृभाषा किंवा राज्यभाषा एक अनिवार्य भाषा म्हणून शिकविली जावी.
- राज्यातील शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी शिकवले जात असले तरी मराठी शिकवणे अनिवार्य होईल.
- मुलांच्या प्रारंभिक वयात मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासाला चालना मिळेल.
- शिक्षकांनी जुलैअखेरपर्यंच बहुभाषिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक.
- सीबीएसईने शाळांना ‘एनसीईआरटी’च्या ‘जादुई पिटारा’ (कथाआधारित शिक्षण साहित्य) आणि बहुभाषिक डिजिटल पाठ्यपुस्तकांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com