

चौघांना सव्वा कोटींचा गंडा
फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपचा मोह कायम
मुंबई, ता. २४ : फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे गुंतवणूक करण्याचा मोह अद्याप कमी झालेला नाही. त्याच मोहापायी शहरातील प्रसिद्ध रुग्णालयात कार्यरत परिचारिका, माशांचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यावसायिकासह चौघांची एकूण सव्वा कोटी रुपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
माशांचे घाऊक व्यापारी डॅनियल जोसेफ (वय ७२) यांना एचएसबीसी बँकेचे नाव वापरून तयार करण्यात आलेल्या बोगस ॲपद्वारे जाळ्यात ओढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोसेफ यांना शेअर खरेदी-विक्रीचा कोणताही अनुभव नव्हता; मात्र ते आकर्षक जाहिरात पाहून भुलले. त्यांनी फेब्रुवारी ते मार्च या काळात तब्बल ५१.५० लाख रुपये भामट्यांच्या खात्यांवर जमा केले. भामट्यांनी तयार केलेल्या बोगस ॲपवर त्यांना दुप्पट, तिप्पट नफा झाल्याचे दिसत होते; मात्र जेव्हा त्यांनी ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला; तेव्हा त्यांना आणखी रक्कम भरण्यास सांगितले गेले, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशाच पद्धतीने व्यावसायिक नीलेश आंब्रे यांना फेब्रुवारी ते मार्चमध्ये २६.४८ लाख रुपयांना फसविण्यात आले. शहरातील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात परिचारिका यांना १९.५० लाख, तर बेस्ट अधिकारी सतीश कामतेकर २२.९३ लाख रुपयांना फसले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.