

तुम्हाला पक्षाचा रबर स्टँप म्हणून बसवलंय का?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : ‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात संवेदनशीलता नाही. वैष्णवी हगवणे प्रकरणाला त्या चिल्लर आणि थिल्लर म्हणतात, पण त्या स्वतःच चिल्लर आणि थिल्लर व्यक्तिमत्त्व आहेत. जेव्हा त्या विरोधात होत्या; तेव्हा एखाद्या प्रकरणावर तावातावाने बाजू मांडत होत्या. तुम्हाला आता फक्त पक्षाचा रबर स्टँप म्हणून बसवलंय का’, असा सवाल करत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर घणाघात केला. परळमधील भारतमाता टॉकीजसमोर शनिवारी (ता. २४) किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जाहीर निषेध आंदोलन केले. त्या वेळी बोलताना पेडणेकर यांनी ‘चाकणकर यांनी फक्त मेकअप करून नेत्यांच्या बाजूला दिसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जरा काम करायला हवे’, असा सल्ला दिला. नीलेश चव्हाण याला कोण वाचवण्याचा प्रयत्न करतंय, असा सवालही त्यांनी विचारला. या वेळी चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा व त्यांच्या जागेवर सक्षम व सुसंस्कृत महिलेला संधी द्यावी, अशी मागणीही किशोरी पेडणेकर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.