

ॲक्सिस बँक सुपरमनीचे रुपे
कॅशबॅक क्रेडिट कार्ड
मुंबई, ता. २५ : ॲक्सिस बँक आणि फ्लिपकार्ट ग्रुपचे क्रेडिट फर्स्ट यूपीआय प्लॅटफॉर्म असलेल्या सुपरमनीतर्फे ॲक्सिस बँक सुपर डॉट मनी रुपे क्रेडिट कार्डची घोषणा करण्यात आली. हे नवे कार्ड डिजिटल आणि प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असून ते यूपीआय, कार्ड पीओएस टर्मिनल, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि एटीएममध्ये वापरता येईल. हे कार्ड स्कॅन अँड पे व्यवहारांवर तीन टक्के कॅशबॅक देईल आणि इतर सर्व खर्चाच्या श्रेणींमध्ये एक टक्का कॅशबॅक देईल. या कार्डासाठी कोणतेही वार्षिक शुल्क नाही, ते कायमस्वरूपी मोफत आहे, असे ॲक्सिस बँकेच्या आर्णिका दीक्षित म्हणाल्या. कार्डधारकांना प्रति स्टेटमेंट चक्रामध्ये ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल तर ४०० ते ४,००० रुपयांपर्यंतच्या इंधन व्यवहारांसाठी एक टक्का इंधन उपकर सवलत मिळेल. त्यात प्रतिस्टेटमेंट चक्रात कमाल ४०० रुपये सवलत मिळेल, असे सुपरमनीचे संस्थापक प्रकाश सिकारीया म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.