

मोतीलाल ओसवाल सर्व्हिस फंड
मुंबई, ता. २५ : मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने आता सर्व्हिस फंड बाजारात आणला असून, त्यात ३ जूनपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. सेवा क्षेत्राच्या व्यवसायातून उत्पन्न मिळवणाऱ्या किंवा या क्षेत्राच्या वाढीचा फायदा घेऊ शकणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंवा शेअरशी संबंधित साधनांमध्ये या फंडातून गुंतवणूक केली जाईल. निफ्टी सर्व्हिस सेक्टर टोटल रिटर्न इंडेक्सचा मागोवा हा फंड घेईल, असे मोतीलाल ओसवाल एएमसीचे एमडी व सीईओ प्रतीक अग्रवाल यांनी सांगितले.
देशात सेवा क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून, गेल्या दोन वर्षांत हे ८.३ टक्क्यांनी वाढले, तर गेल्या एका वर्षात सेवा क्षेत्राची निर्यातही ५.७ टक्क्यांवरून १२.८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सध्या देशातील ३० टक्के कामगार-कर्मचारी सेवा क्षेत्रात काम करतात. सेवा क्षेत्राच्या निर्यातीत भारताचा जगात सातवा क्रमांक आहे, असे असोसिएट फंड मॅनेजर भालचंद्र शिंदे म्हणाले, तर या फंडाचे व्यवस्थापनदेखील शिंदे करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.