

आयटीआयसाठी ५४ हजार अर्ज
ऑनलाइन प्रवेश प्रकिया सुरू
मुंबई, ता. २५ : राज्यात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये विविध ट्रेडसाठी प्रवेश मिळावा यासाठी राज्यातील ५४ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. यातील ४७ हजार ४७१ विद्यार्थ्यांचे अर्ज भरून पूर्ण झाले असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली.
राज्यात शासकीय ४१९ आणि खासगी संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या ५८८ अशा एकूण १,००७ आयटीआय असून, यामधील विविध ट्रेडच्या प्रवेशासाठी १५ मेपासून ऑनलाइन प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. मागील नऊ दिवसांत ५४ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. या प्रवेश प्रक्रियेत २६ मेपासून पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर केले जाणार आहेत. तसेच राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीच्या मूळ गुणपत्रिकाही मिळाल्यानंतर संचालनालयाकडून या प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक आयटीआय प्रवेशाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार असल्याची माहितीही संचालनालयाकडून देण्यात आली. राज्यातील आयटीआयमधील प्रवेशासाठी १५ मेपासून प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले असून, प्रवेश इच्छुक उमेदवारांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशासाठी अर्ज भरण्याचे आवाहन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
...
संभ्रम दूर करा!
राज्यातील सर्व आयटीआय खासगी उद्योग संस्था आणि नामांकित कंपन्यांना दत्तक देण्याचे धोरण निश्चित झाले असून, त्यासाठीचा अंतिम आदेश जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. या धोरणाची यंदाच्या शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी झाल्यास यंदा विविध ट्रेडसाठी घेतलेले प्रवेश अडचणीत येतील काय, यासाठीचा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. त्यावर संचालनालयाने स्वतंत्र आदेश काढून यासाठीचा स्पष्ट असा खुलासा करण्याची मागणीही केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.