पदवी प्रवेशपूर्व नोंदणीची आज अंतिम मुदत

पदवी प्रवेशपूर्व नोंदणीची आज अंतिम मुदत
Published on

पदवी प्रवेशपूर्व नोंदणीची आज अंतिम मुदत

मुंबई, ता. २५ ः मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीसाठी सोमवारी (ता. २६ मे) अंतिम दिवस असून, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपले अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ओळख क्रमांक (एबीसी-आयडी) तयार केलेला नाही, त्यांनी १५ दिवसांच्या आत आपला हा एबीसी-आयडी तयार करून प्रवेश प्रोफाइलमध्ये अद्ययावत करणे बंधनकारक असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एबीसी-आयडी तयार होईपर्यंत महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एबीसी-आयडी तयार करणे आणि ते पोर्टलवर अपलोड करणे ही विद्यार्थी व महाविद्यालय यांची संयुक्त जबाबदारी असून, सर्व संबंधित महाविद्यालये आणि विद्यार्थी यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com