कातळशिल्पे ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत

कातळशिल्पे ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत

Published on

कातळशिल्पे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत
रोडमॅप तयार करण्याचे मंत्री ॲड. आशीष शेलार यांचे निर्देश
मुंबई, ता. २७ : राज्यातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश व्हावा, यासाठी या कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी बैठकीत दिल्या.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, रत्नागिरी येथील निसर्गयात्री संस्थेचे पदाधिकारी तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या कातळशिल्पांना स्पॅनिश शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला, असे सांगून मंत्री ॲड. शेलार म्हणाले, की आपल्याकडील कातळशिल्पांची चांगल्या प्रकारे प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसार करून लोकांचे ध्यान आकर्षित करणे गरजेचे आहे. या कातळशिल्पांवर विभागाने आंतररष्ट्रीय दर्जाची डॉक्युमेंटरी तयार केली पाहिजे. यासाठी या कातळशिल्पांचे फोटो तसेच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात संकलित करून ठेवावे. या छायाचित्रे आणि व्हिडिओंना तंत्रज्ञानाची जोड देण्यावर मंत्री ॲड. शेलार यांनी भर दिला.

केंद्राला प्रस्‍ताव पाठवणार
कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असे सांगून ते म्हणाले, की कातळशिल्पांची व्यापक प्रसिद्धी व्हावी यासाठी समाजमाध्यमांचा वापर करावा. या समाजमाध्यमांवर चांगल्या दर्जाची छायाचित्रे अपलोड करण्यात यावी. डॉक्युमेंट्रीसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांची पारदर्शक पद्धतीने निवड करण्याच्या सूचनाही मंत्री ॲड. शेलार यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com