केंद्र शासनाच्या कार्यालयात त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करा
केंद्र शासनाच्या कार्यालयात त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करा
मराठी भाषा विभागाचे आदेश
मुंबई, ता. २७ : राज्यातील केंद्र शासनाची कार्यालय बँका विमा कंपन्या रेल्वे व इतर कार्यालय यामध्ये त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश सोमवारी (ता. २६) मराठी भाषा विभागाने दिले आहेत. यासाठी विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी शासन आदेश जारी केला आहे.
राज्यात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील केंद्र शासनाची सर्व कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे व अन्य कार्यालये यांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्यात येतो का, येत असल्यास, याबाबत पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासोबत केंद्रांच्या सर्व कार्यालयात मराठी भाषेचा वापर करण्यात येत असल्यास तो कसा केला जातो, यासाठी संबंधित कार्यालयाकडून स्वयंघोषणापत्र विहित नमुन्यात घ्यावे, हे स्वयंघोषणापत्र उपरोक्त नमूद कार्यालयांनी दर्शनी ठिकाणी सूचनाफलकावर प्रदर्शित करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेण्यात यावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी, भाषा संचालक यांनीही या त्रिभाषा सूत्राची तपासणी, स्वयंघोषणापत्र सादर करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. पी. जी. पोर्टल व आपले सरकार प्रणाली व इतर माध्यमांतून मराठी भाषेचा वापर होत नाही, अशा विषयाच्या तक्रारी आल्यास या तक्रारींचे वेळीच निराकरण करावे, पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांना संबंधित केंद्र शासनाच्या कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांना आमंत्रित करून त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेच्या वापराबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करावी, असेही यात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

