रिक्षाचालकांना मीटर रिकॅलीब्रेशन नकोसे!

रिक्षाचालकांना मीटर रिकॅलीब्रेशन नकोसे!

Published on

रिक्षाचालकांना मीटर रिकॅलिब्रेशन नकोसे!
अद्याप ४७ हजार रिक्षा-टॅक्सींचे अद्यावतीकरण बाकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) मीटर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवीन दर १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. नवीन दरानुसार भाडे आकारणी करण्यासाठी मीटरचे रिकॅलिब्रेशन म्हणजे सुधारणा करणे गरजेचे असणार आहे, मात्र अद्यापही ४७ हजार ६०० रिक्षा आणि टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन बाकी आहे.
रिक्षा आणि टॅक्सीचालकांना रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये पुन्हा वाढ करत ३१ मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १ जूनपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
इंधन खर्च, वाहनांची देखभाल-दुरुस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देत मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२५ पासून टॅक्सी आणि रिक्षांच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मान्यता दिली. त्‍यानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपये झाले. मीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत दरपत्रकानुसार भाडे आकारण्याची सूचना करण्यात आली होती.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २३ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत टॅक्सी व ऑटोरिक्षाच्या भाडेवाढीस मान्यता देण्यात आली होती. तसेच ही भाडेवाढ १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू करण्याचे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने निर्देश दिले होते. या भाडेवाढीच्या अनुषंगाने मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु, बहुसंख्य टॅक्सी व ऑटोरिक्षाच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन झालेले नव्हते. त्यामुळे यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपुष्टात आल्यानंतरच्या १ जून २०२५ पासून विलंबासाठी प्रतिदिन विभागीय दंडात्मक शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

* मीटर रिकॅलिब्रेशन
ताडदेव आरटीओ
एकूण टॅक्सी - २६,१४९
मीट रिकॅलिब्रेशन - २१,२४९
बाकी - ४,९००

वडाळा आरटीओ
रिक्षा-टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशन
एकूण रिक्षा - ६९,८९८
मीटर रिकॅलिब्रेशन - ५०,५६१
बाकी रिक्षा - १९,३३७
एकूण टॅक्सी - ८,२५५
मीटर रिकॅलिब्रेशन झालेली संख्या - ५,२९०
बाकी टॅक्सी - २,९६५

बोरिवली आरटीओ
एकूण रिक्षा - ६३,८६१
मीटर रिकॅलिब्रेशन - ५०,३९५
बाकी रिक्षा - १३,४६६
एकूण टॅक्सी - २,०७२
मीटर रिकॅलिब्रेशन झालेली संख्या - ४३०
बाकी टॅक्सी - १,६४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com