शेळीपालनाच्या नावाखाली ड्रग्जनिर्मिती
शेळीपालनाच्या नावाखाली ड्रग्जनिर्मिती
कर्जतमधील फार्महाउसवर छापा; सहा जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : रायगडमधील कर्जतच्या सावली फार्महाऊसमध्ये छापा टाकून मुंबई पोलिसांनी ड्रग्ज फॅक्टरीचा सोमवारी (ता.२६) पर्दाफाश केला. या ठिकाणी शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली अमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, २५ कोटी रुपयांचा अमली पदार्थसाठा तसेच ते करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.
पूर्व उपनगर नशामुक्त करण्यासाठी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी विशेष अमली पदार्थविरोधी पथकाची स्थापना केली आहे. जानेवारीपासून पूर्व उपनगर भागात या पथकाने धडक कारवाई केली. एका ड्रग्ज प्रकरणात एमडी ड्रग्जची निर्मिती कर्जत येथे केली जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांचे पथक कर्जतपर्यंत पोहोचले. सावली फार्महाउसमध्ये शेळीपालन केले जात असल्याचे त्यांना कळाले. या फार्महाउसमधील हालचालींवर बारीक नजर ठेवत पोलिसांनी माहिती काढली. त्या वेळी या ठिकाणी एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या फार्महाउसवर छापा टाकला असता, या ठिकाणी कारखाना सुरू असल्याचे उघड झाले. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी ११ कोटींचे एमडी ड्रग्ज आणि अंदाजे एक कोटींचा कच्चा माल जप्त केला.
२४ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त
अमली पदार्थ विक्रेत्यापासून कारखान्यापर्यंत धागेदोरे शोधताना पाच आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून १३ कोटींचा अमली पदार्थाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. हा साठा सावली फार्महाउसमधून विक्रीसाठी आणण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण २४ कोटींचे एमडी ड्रग्ज आणि एक कोटींचा कच्चा माल पकडला असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

