चार वर्षीय मुलीच्या हत्येनंतर आईची आत्महत्या

चार वर्षीय मुलीच्या हत्येनंतर आईची आत्महत्या
Published on

चारवर्षीय मुलीच्या हत्येनंतर आईची आत्महत्या
तळोजा घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची तत्काळ दखल
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ : तळोजा फेज-१ मधील सोनम केणी (वय ३०) या महिलेने आपल्या चारवर्षीय मुलीची उशीच्या साहाय्याने हत्या करून नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची दखल तत्काळ विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून त्यांनी पोलिस प्रशासनाला या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सोनम हिच्या आत्महत्येचे खरे कारण समोर येणे अत्यंत गरजेचे असून ही घटना केवळ कौटुंबिक कारणावर आधारित आहे, की त्यामागे कोणते सामाजिक, मानसिक अथवा इतर दबाव होते, हे तपासणे महत्त्वाचे असल्याचे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. सोनमच्या आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मी स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. संबंधित यंत्रणांनी वेळीच कार्यवाही करणे गरजेचे आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन महिलांच्या मानसिक आरोग्याची, सुरक्षिततेची व भावनिक गरजांची दखल घ्यायला हवी, असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलिस प्रशासनाला चौकशीस गती देण्याचे तसेच सोनमच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com