

अकरावी प्रवेशाच्या १३ हजार तक्रारींचा निपटारा
शालेय शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी सकारात्मक पाऊल
मुंबई, ता. ३१ : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातून तब्बल १७ हजार ३६५ हजार तक्रारी आजपर्यंत दाखल झाल्या होत्या; त्यातील १३ हजार ५०० हून अधिक तक्रारींचा निपटारा करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात शिक्षण संचालनालयाला यश आले आहे. तर उर्वरित तक्रारींचा निपटारा तातडीने केला जात असल्याची माहिती शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी दिली.
पहिल्यांदाच राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया होत असल्याने विद्यार्थ्यांना या नोंदणीसाठी अनेक अडचणी आणि तांत्रिक बाबींवर विद्यार्थ्यांकडून पसंतीक्रम, महाविद्यालयांची माहिती, स्पेस चुकल्याने आलेल्या अडचणी, नॉन क्रिमिलेअरसह प्रमाणपत्र जोडणे आदी अनेक प्रकारच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी दाखल केल्या आहेत. त्यात बहुसंख्य तक्रारी या शुल्क भरणे, पसंतीक्रम, महाविद्यालयांची यादी, लॉगिन आयडी व पासवर्ड विसरणे, डमी विद्यार्थ्याने अर्ज करणे किंवा अर्ज भरतानाच डबल स्पेस दिली जाणे, अशा तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत असल्याचे या आदीसंदर्भात असल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आलेल्या तक्रारींचा अत्यंत वेगाने निपटारा केला जात असून २ जूनपर्यंत सर्वच तक्रारींचे समाधान होईल, यामुळे विद्यार्थ्यांनी काहीही अडचणी आल्यास त्या आपल्या लॉगीनमधून कराव्यात, असे आवाहनही संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
--
नऊ लाख ६७ हजारांची नोंदणी
अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यातील नऊ हजार ३९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असलेल्या एकूण २१ लाख आठ हजार २१० जागांच्या प्रवेशासाठी आजपर्यंत तब्बल नऊ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी पुढील दोन दिवसांत १२ लाखांहून अधिक होईल, असा विश्वास संचालनालयाकडून व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.