‘एनआयए’चे महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये छापे

‘एनआयए’चे महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये छापे
Published on

‘एनआयए’चे महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये छापे
पाकिस्तानसाठी हेरगिरी
मुंबई, ता. ३१ : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यास अटक केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी (ता. ३१) महाराष्ट्रासह सात राज्यांतील एकूण १५ ठिकाणांवर छापे घालून शोधाशोध केली. या कारवाईबाबत ‘एनआयए’कडून अधिकृत माहिती, तपशील देण्यात आलेला नाही.

हेरगिरीच्या आरोपात दिल्ली येथे केंद्रीय राखीव सुरक्षा बलात (सीआरपीएफ) नियुक्त मोतीराम जाट यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीआधारे एनआयएने महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम या राज्यांमध्ये एनआयए पथकांनी नेमक्या ठिकाणी एकाच वेळी छापे घातल्याचे समजते. दरम्यान, जाट यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या आयएसआय आणि इंटेलिजन्स ऑपरेटिव्हना पुरवल्याची माहिती पुढे आली असून, त्याची खातरजमा सुरू असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com