

१० लाख विद्यार्थ्यांची अकरावीसाठी नोंदणी
विविध अडचणींवर मात
मुंबई, ता. १ : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून, नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये १ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.
प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत असून, संकेतस्थळावर ताण येत असल्याने थोड्या प्रमाणात संकेतस्थळ संथ गतीने चालणे, तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी, कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे, अशा अडचणी निदर्शनास आल्या. या बाबींवर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ उपाययोजना/पर्यायी व्यवस्था करून प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता २६ मे २०२५ ते ३ जून २०२५पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला असून, या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल, असेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून, कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात ९,३४२ कनिष्ठ महाविद्यालयांमधून २० लाख ८८ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाली असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
...
अडचणी दूर करण्यासाठी...
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभाग स्तरावर तांत्रिक सल्लागार, मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाइन नंबर, सपोर्ट डेस्क, संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका, प्रश्न-उत्तरे, विद्यार्थी युजर मॅन्युअल, ‘करिअर पाथ’चा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांस काही बदल करावयाचा असल्यास ग्रीवन्सचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विद्यार्थी/पालक यांच्यासाठी विभाग स्तरावर/जिल्हा स्तरावर अधिकारी/कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.