आरोग्यासाठी सायकलिंगला पसंती

आरोग्यासाठी सायकलिंगला पसंती

Published on

आरोग्यासाठी सायकलिंगला पसंती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईकरांची आरोग्यासाठी सायकलिंगला पसंती मिळत आहे. कोरोनानंतर आरोग्याला अधिक महत्त्व आल्याने मॉर्निंग वॉकसह सायकल चालविणाऱ्यांची संख्या वाढली. प्रत्येकानेच आपल्या बालवयात अर्धा पायडल मारत सायकल शिकण्याच्या कसरती केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी सायकल हा अविभाज्य घटक होता. जसे शहरीकरण वाढले तसे पाचवी-सहावीतील मुलेही दुचाकी घेऊन फिरू लागली. दुचाकी हातात आली, परंतु आरोग्याच्या आणि प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या रूपात सायकलची आवड निर्माण झाली. काही जण मात्र केवळ स्टेटससाठी सायकलचा वापर करताना दिसतात. असे असताना सद्यःस्थितीत आरोग्यासाठी सायकलचा वापर होणे गरजेचे बनले आहे.

पूर्वी पंधराशे ते दोन हजार रुपयांत चांगल्या दर्जाची सायकल मिळत होती, परंतु आता यामध्ये नावीन्यता येत गेली. रेंजर सायकलमुळे किमतींमध्ये वाढ झाली. त्यात नव्याने दाखल झालेल्या गियरच्या सायकलने तरुणाईला भुरळ घातली. सध्या सायकलच्या किमती दुचाकीइतक्या झाल्या आहेत. तरीदेखील आरोग्य सांभाळण्यासाठी सायकलची आवश्यकता भासत आहे.
सायकलिंग आपल्याला आरोग्य देऊ शकते, पण जर योग्य काळजी घेतली नाही, तर ते जीवावरही बेतू शकते.

काय काळजी घ्यावी?
प्रत्येक सायकलस्वारांनी खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे
नेहमी हेल्मेट परिधान करावे
फ्लोरोसेंट जॅकेट परिधान करावे, जेणेकरून आपण दूरवरून दिसू शकतो.
हातांमध्ये ग्लव्ज वापरावे.
आपली सायकल फिट आहे का ते तपासावे


सायकलिंग सोयीसुविधांवर नाही, तर तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. मी २००५ पासून नियमितपणे रनिंग (धावणे) करत आहे. २०१५ मध्ये हाफ मॅरेथॉन दोन तासांच्या आत पूर्ण केली. २०१६ पासून मी रनिंगमुळे गुडघ्यांना होणाऱ्या त्रासापासून स्वतःला वाचवण्यासाठी सायकलिंग सुरू केली. माझ्या मी रोज २० किलोमीटर सायकल चालवतो, तर रविवारी ५० किलोमीटर सायकल चालवतो.
- ॲड. अमर मिश्रा, सायकलस्वार
दिवसेंदिवस सायकल चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. आरोग्याच्या दृष्टीने सायकल फायदेशीर आहे. सायकल चालवण्यासाठी ट्रॅक असावा असे नाही. नियमित रस्त्यावर एक लाइन मार्किंग जरी केली तरी सायकल चालवणे अजून सोपे होईल.
योएल मेनाचेरी, सायकलस्वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com