मुंबई टूडे लीड - मान्सून दाखल,  ''आपली चिकित्सा'' अजूनही प्रतिक्षेत

मुंबई टूडे लीड - मान्सून दाखल, ''आपली चिकित्सा'' अजूनही प्रतिक्षेत

Published on

मॉन्सून दाखल, ‘आपली चिकित्सा’ अजूनही प्रतीक्षेत
रुग्णांना चाचणीसाठी बघावी लागणार वाट
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मॉन्सून यावेळेस वेळेपूर्वी आला आहे, पण पालिकेची बंद असलेली महत्त्वाकांक्षी आणि सार्वजनिक उपयुक्तता चाचणी योजना ‘आपली चिकित्सा’ अद्याप सुरू झालेली नाही. पावसाळ्यातील आजार डोके वर काढत आहेत, अशा परिस्थितीत, रुग्णांना चाचण्या करण्यासाठी उपनगरीय रुग्णालयांमध्ये जावे लागेल आणि चाचणीसाठी अजून वेगळी लढाई लढावी लागेल.
पालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेली ‘आपली चिकित्सा’ १५ डिसेंबरपासून बंद आहे. पालिकेने चाचणी सुविधा देण्यासाठी नियुक्त केलेल्या कृष्णा डायग्नोस्टिक्सने निविदेतील अटींनुसार चाचण्यांची संख्या आणि रक्कम दोन्ही पूर्ण केले आहेत. निविदा चार वर्षांसाठी होती, पण निर्धारित चाचण्या दीड वर्षात पूर्ण झाल्यामुळे निविदाच संपली. ‘आपली चिकित्सा’ बंद झाल्यामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना उपनगरीय रुग्णालयांमध्ये तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असून, बाहेरून चाचण्या कराव्या लागत आहेत.
रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, काही रुग्णालयांमध्ये मूत्र आणि विष्ठेचे नमुने बाहेरही पाठवले जात आहेत. पालिका आरोग्य विभागाशी संबंधित एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या वेळी पावसाळा लवकर आला आहे. त्यामुळे तापाचे रुग्ण येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत सीबीसीसारख्या किमान मूलभूत चाचण्या महत्त्वाच्या आहेत, पण आपली चिकित्सा कधी सुरू होईल, याची कल्पना नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्याने फक्त सांगितले की, चाचणी सुविधा एक ते दीड महिन्यात सुरू होईल. सध्या क्लिनिक, प्रसूतिगृहांमध्ये चाचणी केली जात नाही आणि रुग्णांना उपनगरीय रुग्णालयांमध्ये जाण्यास सांगितले जात आहे. यापूर्वी पालिका दवाखान्यातच चाचण्या केल्या जात होत्या आणि रुग्णांना उपनगरीय रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नव्हती.
व्यवसायाने ऑटोचालक आणि उपनगरातील रहिवासी राकेश पांडे यांनी सांगितले की, दवाखान्यातील चाचणी सुविधा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. पूर्वी रक्त चाचण्यांचे हे एकमेव पर्याय होते. आता दवाखान्याचे डॉक्टर चाचण्या लिहून देतात आणि मोठ्या पालिका रुग्णालयात जाण्यास सांगतात.
भाविक गज्जर म्हणाले की, त्यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप येत आहे, त्यांनी पालिका दवाखान्यातून औषधे घेतली आहेत, परंतु डॉक्टरांनी त्यांना सीबीसीसह काही चाचण्या करण्यास सांगितले आहे. यासाठी त्यांनी मला बोरिवली किंवा कांदिवलीतील मोठ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले आहे. पूर्वी या चाचण्या दवाखान्यात केल्या जात होत्या. जास्त गर्दी नव्हती. चाचणी सुविधा पुन्हा कधी सुरू होईल, हे माहीत नाही.

जवळपास तीन महिने पूर्ण होणार
पालिकेने २१ जानेवारी रोजी निविदा जारी केली होती, परंतु काही कारणांमुळे पालिकेने मार्चमध्ये ती निविदादेखील रद्द केली. त्यानंतर १३ मार्च रोजी नवीन निविदा जारी करण्यात आली. जवळजवळ तीन महिने पूर्ण होणार आहेत, परंतु आतापर्यंत पालिका कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेली नाही.

सुरू होण्यास किमान एक महिना लागणार
पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, निविदा सध्या मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मंजुरी मिळाल्यानंतरही, कंपनीला सेटअप आणि तयारीसाठी सुमारे एक महिना लागेल. करारानुसार पालिकेच्या ४९८ आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय सेवा द्याव्या लागतील. यामध्ये, ४४० एचबीटी दवाखाने, ३० प्रसूतिगृहे, तीन शहरी आरोग्य केंद्रे, पाच विशेष रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये, कूपर रुग्णालय आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात चाचणी सुविधा द्यावी लागेल.

डॉक्टरांना स्टेथोस्कोप आणि बीपी मशीनसह काही आवश्यक निदान सहाय्याची आवश्यकता असते. जरी १०० चाचण्या होत नसल्या तरी १५ ते २० मूलभूत चाचण्या रोग ओळखण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. पावसाळ्यात रुग्णांची संख्या वाढते, म्हणून चाचणी सुविधा असणे अधिक महत्त्वाचे बनते. पालिकेने या बाबीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. रवी दुग्गल, आरोग्य अर्थशास्त्रज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com