पवई व तुळशी तलावातील गाळ काढण्यासाठी कृती आराखडा सादर करा
पवई व तुळशी तलावातील गाळ काढण्यासाठी कृती आराखडा सादर करा
पालकमंत्री आशीष शेलार यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः पवई तलाव, तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यांत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी दिले.
पवई तलावातील गाळ काढण्यासंदर्भात आज (ता. २५) मंत्रालयात आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्यासह पर्यावरण विभाग, बृहन्मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी जुलैमध्ये पवई तलाव भरून वाहत असतो, मात्र यंदा जून महिन्यातच पवई तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे गाळ न काढल्यामुळे हा तलाव लवकर भरला का, तसेच तलावातील गाळ काढण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनासंदर्भात या वेळी चर्चा झाली. पवई तलावातील प्रदूषणासंदर्भात मेरी या संस्थेने सर्वेक्षण केले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
जलपर्णी वाढली
पवई तलावाचा परिसर हा ५५७ एकरावर आहे. या तलावात परिसरातील सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे जलपर्णी वाढली आहे. हे सांडपाणी रोखण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. पवई, तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढल्यानंतर त्याची वाहतूक व त्याच्या साठवणुकीसंदर्भात अभ्यास अहवाल तयार करून कृती आराखडा तयार करावा. गाळ काढण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत घेण्यात यावी, अशा सूचना शेलार यांनी या वेळी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

