राज्यात समान विकासावर भर

राज्यात समान विकासावर भर

Published on

राज्यात समान विकासावर भर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. २५ : केवळ मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणात महाराष्ट्राचा औद्योगिक विकास न होता सर्व राज्याचा समान विकास व्हावा यावर उद्योग क्षेत्र आणि सरकार काम करीत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे आयोजित महाराष्ट्र उद्योग संवादात ते बोलत होते. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्याद्वारे ५० लाख रोजगारनिर्मिती होऊन महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल, असेही त्यांनी सांगितले.
देशाला औद्योगिक प्रेरणा देणारे महाराष्ट्र हे राज्य असून, इको फ्रेंडली कामकाज करणारे राज्य, उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य, अशी आपली ख्याती आहे. येथे व्यवसाय सुलभता ही फक्त कागदावर नसून प्रत्यक्षात उतरली आहे. आगामी काळात जागतिक दर्जाचे डिजिटल उत्पादन राज्यात होण्यासाठी प्रयत्न केले जातील. नवी मुंबईत सुरू होणारा सेमीकंडक्टर चीप प्रकल्प गेम चेंजर ठरेल. महाराष्ट्रातील डेटा सेंटर, इलेक्ट्रिक व्हेईकल कारखाने ही नवी तीर्थस्थळे आहेत, असेही शिंदे म्हणाले.
........
उद्योजकांना प्रोत्साहनपर वातावरण हवे : राज्यपाल
उद्योजकांना प्रोत्साहन देणारे वातावरण असेल, तरच उद्योजक कोठेही आनंदाने येतील. आपली गुंतवणूक सुरक्षित आहे हा विश्वास त्यांना मिळायला हवा, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्याची औद्योगिक वाढ झाली तरच रोजगारनिर्मिती होईल. त्यामुळेच लोकांचे जीवनमान उंचावेल आणि एकंदर समाजाचा विकास होईल. या उद्योजकांमुळेच महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर राहील आणि देशाच्या विकासाला हातभार लावेल, अशा शब्दात राज्यपालांनी उद्योजकांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com