

आठ दिवसांत ९८४ फुकट्यांवर कारवाई
प्रथम श्रेणी डब्यात मध्य रेल्वेची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : उपनगरी रेल्वेच्या प्रथम श्रेणी डब्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर मध्य रेल्वेने बडगा उगारला आहे. मध्य रेल्वेने १६ ते २४ जून या कालावधीत १०३ उपनगरी गाड्यांमध्ये केलेल्या तपासणीत ९८४ प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांच्याकडून तीन लाख १८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
उपनगरी रेल्वेच्या द्वितीय श्रेणी डब्यातील गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रवासी प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे प्रथम श्रेणीचे तिकीट आणि पास असलेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यातून अनेकदा विनातिकीट प्रवासी आणि प्रथम श्रेणीच्या प्रवाशांमध्ये वादही होतात. त्यामुळे मध्य रेल्वेने या डब्यात तिकीट तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) सात कर्मचाऱ्यांसह, ४१ तिकीट तपासनीसांची विशेष पथके गर्दीच्या वेळी प्रथम श्रेणी डब्यात तपासणी मोहीम राबवित आहेत. या मोहिमेमुळे मध्य रेल्वेच्या तिकीटविक्रीत १० टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.