तलावांमधील जलसाठ्यात वाढ

तलावांमधील जलसाठ्यात वाढ

Published on

तलावांमधील जलसाठ्यात वाढ
मुंबईला १२५ दिवस पुरेल इतके पाणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे तलावांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसामुळे बुधवारी (ता. २५) सकाळी ६ वाजेपर्यंत सातही तलावांत ५,०६,८९० दशलक्ष लिटर म्हणजे ३३ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील १२५ दिवस म्हणजे २७ ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबई दररोज ३,८५० दशलक्ष लिटर आणि ठाणे, भिवंडी महापालिकेला दररोज १८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मुंबई महापालिकेकडून करण्यात येतो. सातही तलावांत मिळून ५,०६,८९० दशलक्ष लिटर म्हणजे ३३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा १२५ दिवस पुरेल इतका आहे. १० दिवसांपूर्वी तलावांतील पाणीसाठ्याची पातळी नऊ टक्क्यांवर आली होती. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पालिकेनेही राखीव साठा वापरण्यास सुरुवात केली, मात्र गेल्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने तलावांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ होऊ लागली आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची गरज असते. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही, मात्र जर पाणीसाठा कमी असेल, तर मुंबईकरांवर किमान पाच टक्के ते २० टक्के इतक्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागते, मात्र सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
तलाव पाणीसाठा टक्के
अप्पर वैतरणा ९११८५ ४०.१६
मोडक सागर - ६९९७८ ५४.२८
तानसा -: ५६३०२ ३८.८१
मध्या वैतरणा ७०५७७ ३६.४७
भातसा -: २०४०७६ २८.४६
विहार -: ११५५८ ४१.७३
तुळशी -: ३२१४ ३९.९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com