तरुणाकडून आयआयटीची रेकी

तरुणाकडून आयआयटीची रेकी
Published on

तरुणाकडून आयआयटीची रेकी
मुंबई, ता. २५ ः विद्यार्थी असल्याचे भासवत तब्बल दोन आठवड्याच्या वास्तव्यात कर्नाटकच्या बिलाल अहमद तेली या २२ वर्षीय तरुणाने आयआयटी संकुलाची रेकी केल्याचे स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. गुन्हे शाखेने बिलाल यास अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. बिलालने २ ते ७ जून आणि १० ते १७ जून या काळात संकुलातील विविध वसतिगृहांमध्ये वास्तव्य केले. तसेच काही शैक्षणिक तासांनाही त्याने हजेरी लावली होती. आयआयटीतील एका शिक्षिकेने बिलाल यास दोन वेळा संशयास्पदरित्या वावरताना पाहून सुरक्षा रक्षकांना सतर्क केले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यास ताब्यात घेत पवई पोलिसांच्या हवाली केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com