शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा
शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा
८,५५६ पदांची गुणवत्ता यादी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मागील काही महिन्यांपासून रखडलेली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षणाने बुधवारी शिक्षकांच्या आठ हजार ५५६ पदांच्या भरतीसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीची प्रक्रिया रखडल्याने ‘सकाळ’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यात शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान अधोरेखित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने आज शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात निवेदन जारी करून ही भरती प्रक्रिया करण्यासाठीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शाळा व्यवस्थापनाला दुसऱ्या टप्प्यांतर्गत ‘मुलाखतीसह’ पदभरती करण्यासाठी मुलाखत व अध्यापन कौशल्यांसाठी गुणवत्ता यादी उपलब्ध केल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा तातडीने भरल्या जाणार आहेत.
शिक्षकभरतीत पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षण सेवकांच्या, शिक्षकांची आठ हजार ५५६ रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेतले जाणार आहेत. राज्यातील आठ हजार ५५६ पदांपैकी आठ हजार २६४ पदांसाठी १२ हजार ९६६ उमेदवारांची अधिकाधिक १० प्राधान्यक्रमांसाठी एकूण ७१ हजार ८०२ प्राधान्यक्रमांवर शिफारस करण्यात आली आहे.
---
मानक कार्यपद्धती निश्चित
पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही केली जात आहे. यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये २१ हजार ६७८ आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ‘मुलाखतीशिवाय’ या प्रकारांतील पदभरतीची कार्यवाही करण्यात येत असून त्यासाठी मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.