निर्देशांकांत सलग तिसऱ्या दिवशी वाढ

निर्देशांकांत सलग तिसऱ्या दिवशी वाढ

Published on

निर्देशांकांत सलग तिसऱ्या दिवशी वाढ
सेन्सेक्स १०००.३६ अंश, तर निफ्टी ३०४.२५ अंश वधारला
मुंबई, ता. २६ : आखातात परतलेली शांतता आणि भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती दाखवणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या अहवालामुळे आज गुंतवणूकदारांनी बड्या शेअरमध्ये जोरदार खरेदी केल्याने निर्देशांक तिसऱ्या दिवशीही वाढले. सेन्सेक्स १०००.३६ अंश, तर निफ्टी ३०४.२५ अंश वाढला. जागतिक शेअर बाजारही नफा दाखवीत असल्यामुळे सेन्सेक्स ८३ हजारांच्या, तर निफ्टी २५ हजार ५०० च्या वर गेला. अमेरिका-इराण यांच्यात चर्चा सुरू होण्याच्या बातम्यांमुळे तसेच भारतीय अर्थव्यवस्थेची चांगली स्थिती दाखवणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या अहवालामुळे आज सेन्सेक्सचे व्यवहार ८३ हजारांवर आले. दिवसअखेर सेन्सेक्स ८३,७५४.८७ अंशावर, तर निफ्टी २५,५४९ अंशांवर स्थिरावला. भारती एअरटेल, मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे निर्देशांकदेखील वाढले. खासगी बँका, ऑइल अँड गॅस, धातूनिर्मिती हे निर्देशांक एक ते दोन टक्के, तर बँक निफ्टीदेखील आज वाढला. टाटा स्टील, बजाज फायनान्स, एअरटेल, अदाणी पोर्ट, एटर्नल, अडीच टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. एचडीएफसी बँक, बजाज फिन्सर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक दोन टक्के वाढले.
.....
देशांतर्गत अर्थव्यवस्था उत्तम
आखातात शांतता झाल्यामुळे तेल आणि पुरवठा साखळी अबाधित राहणार म्हणून गुंतवणूकदार खुशीत असून, देशांतर्गत अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली झाल्यामुळे देशी वित्तसंस्थादेखील खरेदी करत आहेत. चलनवाढ घटत असल्याने बँका, वाहननिर्मिती कंपन्या यांना चांगली मागणी आहे, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com