‘एकादशी’च्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन : सरनाईक
‘एकादशी’च्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन : सरनाईक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीने ५,२०० बसची व्यवस्था केली आहे. या बस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी आणि या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले, की गेली कित्येक वर्षे विठूरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे. यानिमित्ताने माणसातील विठूरायाची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे. अर्थात हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम मी राबवणार आहे, असे सरनाईक यांनी या वेळी सांगितले.
...
कुठे असेल व्यवस्था?
आषाढी वारीच्या काळात ५, ६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.