ज्येष्ठ लोककलाकारांच्या मानधनाबाबत निर्देश

ज्येष्ठ लोककलाकारांच्या मानधनाबाबत निर्देश

Published on

ज्येष्ठ लोककलाकारांच्या मानधनाबाबत निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनाविषयक कार्यप्रणाली (एसओपी) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा कळवावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी आज विभागाला दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला त्याच्या आवेदनासंदर्भात लेखी पत्रोत्तर ठरलेल्या कालावधीत दिले गेलेच पाहिजे, अशाही सूचना शेलार यांनी दिल्या.
मंत्रालयात आज ज्येष्ठ कलाकारांच्या मानधन प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक पार पडली, त्या वेळी शेलार यांनी हे निर्देश दिले. या वर्षीची ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनासाठीची आवेदन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. दरवर्षी ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनविषयक अनेक तक्रारी येतात. या तक्रारींचे कालबद्ध निवारण करण्यासाठीही शेलार यांनी योग्य ते निर्देश सांस्कृतिक कार्य संचालकांना दिले आहेत. प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला त्याच्या मानधनविषयक आवेदनाचे उत्तर लेखी स्वरूपात वेळेत दिले गेले पाहिजे. त्यामुळे कलाकारांमधे प्रक्रियेसंदर्भात विश्वास अधिक वाढीस लागेल, असे ते म्हणाले. अनेक जिल्ह्यात ज्येष्ठ कलाकार मानधनविषयक समित्यांचे गठण अजून सुरू आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्येष्ठ कलाकार मानधनविषयक प्रक्रियेची कार्यप्रणाली पुन्हा एकदा कळवणे आवश्यक आहे, असेही आशीष शेलार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com